नाही म्हटले तरी आता चाळीशी आली की! OMG, पण अजूनही लहान असल्यासारखेच वाटते आहे. हे जग आता कुठे थोडे फार कळायला लागले आहे असे अनेक वेळेला वाटते. तिशी मध्ये तारुण्य आणि अनुभव दोन्ही असतात म्हणे, ते तारुण्य चाळीशीत थोडं कमी आणि अनुभव थोडा जास्त असा कल आता दिसू लागणार तर. म्हणूनच जसे आहोत तसेच पुढे maintain केले तरी मिळवली म्हणायची!     

पण खरेच चाळीशी हा खूप महत्वाचा टप्पा असतो आयुष्यातला. नक्कीच. जगात जे काही तुम्हाला prove करायचे असते ते एकतर झालेले असते किंवा अजून काही prove करायची ताकद तरी उरलेली नसते! असे म्हटले आहे की

चाळीशी पर्यंत घ्यावे आणि चाळीशी नंतर द्यावे.

आतापर्यंत खूप झाले घेऊन सगळ्यांकडून…आता देण्याची वेळ आपली आहे. 

नाही म्हटले तरी खूप शिकतो आपण आतापर्यंत. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे ते. शाळेत जे शिकलो त्याचा काहीच उपयोग नाही…ते पण. ज्या गोष्टी आतापर्यंत कवटाळून ठेवल्या त्या सोडून खरी मेख तर दुसरीकडेच आहे तेही.

How it works तर शिकलोच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे How it doesn’t work हे जास्त वेळा शिकलो.

अनुभव…अनुभव म्हणजे तरी दुसरे काय?

शाळेपासून सुरु झाली ती मार्कांची किंमत, मग नोकरीची किंमत, हव्या हव्याश्या वाटणाऱ्या त्या तरुणाईची किंमत, settle होण्याची किंमत, घराची किंमत, गाडीची किंमत, पैश्याची किंमत, नात्यांची किंमत, माणसांची किंमत, जगण्याची किंमत आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे वेळेची किंमत. किती किमती वस्तू. त्या त्या वेळी त्या सगळ्याच किमती असतात. पण खरी महत्वाची असते ती आनंदाची किंमत, समाधानाची किंमत.

हे सगळं मागे वळून बघताना सोपं वाटतं पण त्या त्या वेळी सगळे कळतेच असे नाही. कळले तरी वळतेच असे नाही. 

काय जग बदललं आहे या ४० वर्षात! खरं तर गेल्या २० वर्षातच जास्त बदल झाला. दूरदर्शन ते केबल ते आता Netflix, लँडलाईन ते मोबाइल ते स्मार्ट फोन, मारुती कार ते होंडा ते आता टेस्ला मोटर्स, वाडा ते अपार्टमेंट्स ते आता सेकंड होम्स, माठातले पाणी ते बिसलेरी ते आता हवापण शुद्ध करणारे यंत्र, चांगले न फाटलेले कपडे ते जाणून बुजून फाडलेल्या (आणि तरीही महाग) जीन्स, परदेशात जाणे म्हणजे getting arrived in life ते आता Covid मुळे उभारलेल्या भिंती. आणि ही तर नुसती सुरुवात आहे. अजून बराच बदल घडायचाय. Computer, Internet आणि Mobile नं जे काही बदल सुरु केलेत ते काही लवकर संपणारे नक्कीच नाहीत. आपले आणि पुढच्या काही पिढ्यांचे आयुष्य नुसते नवीन आलेली technology शिकण्यातच निघून जाणार हे नक्की. काल शिकलेली गोष्ट आज आऊट होते आहे, इतका हा बदल अचंबित करणारा आहे.

Evolution ची Revolution कधी झाली तेच कळलं नाही.

इतकं सगळं बदललं तरी माणूस आणि त्याचे सुख काही विशेष बदलले नाही.

अजूनही आपण लहान गोष्टीं मध्येच खरा आनंद घेतो.

टेस्ला असो किंवा मारुती, एकटे गाडी चालवायला कुणालाच आवडत नाही. फक्त काही जणांना ते कळायला उशीर लागतो आणि काहीजण ते लवकर हेरतात. हेच आता पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. कलिंगडाला watermelon म्हणणारी हि पिढी अगदी आपल्यासारखीच आहे. फक्त अभ्यास आणि परदेश त्यांच्या आयुष्यात जरा जास्तच लवकर आला आहे. Covid मुळे कदाचित एक वर्ष तरी सुटका होईल त्यांची पण त्यांनाही ही revolution bear करायलाच लागणार आहे. 

या revolution मध्ये जे काही कमावले आणि जे काही गमावले त्याचा हिशोब मांडून आता पुढे काहीतरी चांगली Apps घडावीत हीच सदिच्छा!

5 2 votes
Rate this content
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Newest
Oldest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x