Minions ना म्हणे boss हवा असतो. सारखी काहीतरी ऑर्डर घ्यायला. माणसाचं पण तसंच काहीसं आहे. (शेवटी माणसानेच तर minion चा शोध लावला ना!) आपण पण सारखे कुठल्या ना कुठल्या तरी राजाच्या शोधात असतो. तोंड फाडून स्तुती करायला नाहीतर कुठल्याही गोष्टीचं खापर फोडायला! इतकं की लहान मुलांच्या गोष्टीत पण आपण जंगलचा राजा आणला. फळांचा पण राजा आपणच ठरवला. त्या बिचाऱ्या प्राण्यांना आणि फळांना माहित तरी असेल का. काही देश तर अजूनही, de facto, राजाला follow करतात. (हे follow प्रकरण आजकाल social media च्या जमान्यात भलतंच उथळ झालंय).
राजा म्हणजे अगदीच down market नको म्हणून आता stars आलेत. Movie stars, Sports stars (पुढे या stars चा पण इतका सुळसुळाट झाला कि आपण त्यात पण किंग आणि गॉड शोधायला लागलो!) , न जाणो आणखी कुठले कुठले stars. मग त्यांना फाट्यावर मारायला काहीजण ‘आम आदमी’ म्हणून आले आणि स्वतःच star व्हायच्या मागे लागले. हा आता नवा trend आहे. एकदम भारी दिसणाऱ्या हिरोपेक्षा, असा आपल्यातला वाटणारा कॉमन मॅन जर उच्च पदावर बसला तर लोकांना जास्तच आवडतो. आपण स्वतःच तिथे बसलो आहोत किंवा बसू शकतो हा आत्मविश्वास बळावतो. काहीच गैर नाही यात. खर तर असे लोक, खर सांगायचं तर system, समाज प्रबोधनचं जास्त करते. आणि त्यामुळेच तर हे लोकांनी de facto accept केलंय.
पण खरा problem होतो जेव्हा हे सगळं ‘देवत्वा’ कडे आणि जास्त करून ‘राक्षस’त्वा कडे जातं तेव्हा.
त्या राजाची किंवा star ची अशी प्रसिद्धी/कुप्रसिद्धी केली जाते, rather ‘होते’, कि तो माणूस एकतर देवत्वाकडे नाहीतर राक्षसत्वा कडे फेकला जातो. ते म्हणतात ना media तुम्हाला एका दिवसात उचलू शकते नाहीतर एकदम कचऱ्याच्या डब्यात टाकू शकते. आणि आता एकंदरीत negativity पसरवणाऱ्या media (त्यात social media पण आघाडीवर आहे) मुळे आपला समाज आता राक्षसांनाच जास्त जन्माला घालताना दिसतोय. एखाद्याला इतकं वाईट दाखवलं जातं, की त्याच्या विरुद्ध कोणी उभा असेल तर तो चांगला ठरतो. हे म्हणजे machines ना जसं 1 or 0 च कळतो तसं काहीसं माणसाचं झालंय. माणसामध्ये आणि machines मध्ये पण खरंतर काय फरक आहे कुणास ठाऊक. जसं Alexa चं progrmming होतं, तसच माणसाचं ही programming गेले अनेक वर्ष चालू आहे. फरक इतकाच कि इथे माणूसच माणसाचं programming करतो. ती Alexa आता Artificial Intelligence मुळे स्वतःच एकलव्या सारखी शिकेलही पण माणूस त्याच्या Human Intelligence चा वापर अजून कमी कमी करताना दिसू नये म्हणजे मिळवली.
तर सांगायचं मुद्दा असा, की हे ‘स्टारत्व’ काही संपणारे नाही, that is the way we humans think. आपणही त्या minions सारखे सदैव boss च्या शोधात जरी असलो तरी तो boss अगदीच मोगॅम्बो नाहीतर गब्बरसिंग नसावा ही काळजी आपणच घेतली पाहिजे. राजत्व, स्टारत्व आणि एकवेळ देवत्वही परवडेल पण राक्षसत्चाचा अतिरेक नको. समोरचा वाईट आहे म्हणून मी चांगला आहे असं म्हणणाऱ्या माणसाला आपण पहिलं वाळीत टाकलं (social distancing!) पाहिजे. ती प्रवृत्ती म्हणजेच आजचा खरा virus आहे.