Lesson 11 of 11
In Progress

Strait of Hormuz

२ ० २ ६ च्या आधी अजिबात माहीत नसलेली पण आता अगदी परिपूर्ण ओळख पटलेली गोष्ट म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मूझ . आपण शाळेत सुएझ चा कालवा शिकलो होतो पण हा होर्मूझ इतका कालवा करेल असे कुणाला तरी वाटले असेल काय. हा प्रश्न अगदीच syllabus च्या बाहेरचाच आला. ट्रम्प ने तरी वाचला होता काय हा शब्द शाळेत असताना काय माहित. कदाचित अमेरिकेत हे असलेच शिकवत असावेत अगदी लहानपणापासून – कोण जाणे .

तर मुद्दा असा कि हा स्ट्रेट ऑफ होर्मूझ एकदम नवीनच आयुष्यात आला नवीन वर्षात. सगळा महाराष्ट्र अजित पवार यांच्या दुःख्खात असताना हा होर्मूझ असा अचानक घरातला गॅस घेऊन गेला आणि रोज आपला वेळ तो Open झालाय की Close च आहे अजून – असा जाऊ लागला.

या सगळ्याचा जास्तीत जास्त आनंद कुणाला झाला असेल तर हे मीडिया वाले. TV चॅनेल वाले अगदी जाम खुश झाले. त्यांना रोज नवीन काय बातम्या आणू हा प्रश्नच उरला नाही. सगळे युद्ध शास्त्रामध्ये निपुण झाले आणि आजची ट्रेन आली कि गेली हे बघायच्या ऐवजी ‘जहाज’ मुंबई बंदरात आले कि नाही हे बघू लागले.

त्यात तो जो कोण ‘तात्या’ अमेरिकेने खुर्चीवर बसवला आहे त्याच्या कारनाम्यांनी तर सगळ्या जगातल्या नेत्यांना अगदी सळो की पळो करून सोडले आहे. तात्यांनी तर त्या ‘व्हाईट हाऊस’ चे अगदी ‘वाईट हाऊस’ करून टाकले आहे. हे तात्या Truth टाकतात म्हणे त्यांच्या स्वतःच्याच Social Platform – Truth Social वर. पण त्यांनी टाकलेले Truth बाकी सगळे False ठरवतात. एकूणच या खऱ्या – खोट्या मध्ये सामान्य माणसाचे स्वयंपाक घर Open नाहीतर Close होत आहे.

या सगळ्या गदारोळात तो AI सुद्धा आ वासून त्या स्ट्रेट ऑफ होर्मूझ कडे बघत बसला आहे. सगळे पूर्वीसारखे झाले कि तो तयार च आहे सगळे बिघडवण्यासाठी. सामान्य माणूस एकदा गॅस घेऊन आला कि हा AI सगळी हवा काढून घेण्यास तयारच आहे.

एकूण काय तर सगळा घोळ चालू आहे. त्या Covid ने सुरुवात केली आणि आपल्या जगाची साडेसाती काही संपतच नाहीये. Covid ने सगळ्यांची तोंडे गप्प केली, या होर्मूझ ने सगळ्यांची कामे ठप्प केली. आणि आता त्या Tariff चे काय होणार कोण जाणे. तात्या जोपर्यंत आहेत तो पर्यंत काही कुणाला उसंत मिळणार नाही.

यात आणखी भर म्हणजे महाराष्ट्रात आता वेग वेगळी Truths बाहेर येत आहेत. देवाच्या नावाखाली लोकांना शेंडी लावण्याची परंपराच आहे आपल्याकडे. यात आणखी नवीन भर.

एकूणच कलियुग आले आहे कि काय असेच वाटत आहे. एकदाच हे कलियुग संपूदेत हीच सदिच्छा. पण एक मात्र खरे आहे. जोपर्यंत तात्या वाईट हाऊस मध्ये आहेत तोपर्यंत काही कुणाला उसंत मिळणार नाही. रोज नवीन नवीन Truths बाहेर येत राहणार – एवढेच एक खरे Truth आपल्या नशिबात आहे हे मात्र खरे.